नाशिक । नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या उपनेत्याने आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअप केला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा व्हॉट्सॲप केल्याची सूत्रांची माहिती आहे. शिर्डीत लोकसभा मतदारसंघात नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.
बबनराव घोलप हे माजी मंत्री आहेत. देवळाली मतदारसंघात 5 वेळा आमदार राहिले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच एका मोठ्या नेत्याने पदाचा राजीनामा दिला. नुकत्याच उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या शिर्डी, संगमनेर दौऱ्यात देखील बबनराव घोलप यांना डावलण्यात आले होते.
Discussion about this post