अमरावती । धामणगाव रेल्वे नजीक धावत्या मालगाडीचे अचानक २५ डबे रुळांवरून घसरले आहेत यामुळे दीड तास रेल्वेसेवा विस्काळीत झाली. तसेच पुढील रेल्वेवर देखील याचा परिणाम झाला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमरावतीच्या धामणगाव येथे रेल्वे मालगाडीचे २५ डबे निसटल्याची घटना समोर आली आहे. मालगाडीचे कपलिंग तुटल्याने २५ डबे निसटले असल्याची माहिती आहे. दोन डब्यांना जोडणारा कपलिंग तुटल्याने ही घटना घडली आहे. धामणगाव रेल्वे जवळच ही घटना घडलीये. रेल्वेचे डबे निसटल्याने रेल्वे सेवा दीड तास ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच तातडीने या डब्यांना धामणगाव रेल्वे स्थानकावर हलविले. त्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली.
गेल्या २ तासांपासून रेल्वेसेवा विस्कळीत होती याचा परिणाम अन्य रेल्वेसेवेवर देखील झाला. बाकिच्या काही एक्सप्रेस ट्रेन देखील मागे थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला.
Discussion about this post