जळगांव : जिल्ह्यात कार्यरत असलेले उत्पादन व सेवा क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मोठे उद्योगांनी त्यांना आवश्यक असलेल्या कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा मनुष्यबळाची मागणी 8 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदवावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी केली आहे.
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. याकरिता जिल्ह्यातील युवक-युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांना रोजगार प्राप्त होणे करिता आवश्यक कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणा दरम्यान स्वारस्यामध्ये वृध्दी होऊन प्रशिक्षणाअंती यशस्वी उमेदवारांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होतील.
उद्योगांनी कौशल्याची मागणीची गरज नोंदविल्यास त्या कौशल्यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणामध्ये करणे शक्य होईल व जिल्ह्यास आवश्यक असणारी क्षेत्रनिहाय मनुष्यबळाची गरज लक्षात येवुन उदयोगांना लागणारे कौशल्य मनुष्यबळ निर्माण करणे सोईचे होईल. सदर मोहीमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/3LQGQTayTnk2gZW9 वर 8 सप्टेंबर 2023 पर्यंत मागणी नोंदवावी. असे आवाहन श्री मुकणे यांनी केले आहे.
Discussion about this post