जळगाव | आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जळगावात असून त्यांच्या उपस्थिती स्वाभिमानी सभा पार पडत आहे. याच दरम्यान शरद पवार यांनी भाजपला मोठा झटका दिलाय.
जळगाव जिल्ह्यात तब्बल तीन वेळा आमदारकी भूषविणारा भाजप नेता बी एस पाटील आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे फक्त बी एस पाटील हेच नाहीत तर आणखी काही माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे जळगावात आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.
शरद पवार मंत्री अनिल पाटील यांच्यावर काय बोलणार?
शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. त्यांची जळगावात आज सभा पार पडणार आहे. जळगावच्या अमळनेर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री अनिल पाटील निवडून आले आहेत. अनिल पाटील यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यात शरद पवार काय प्रहार करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Discussion about this post