जळगाव । जळगाव जिल्ह्यात सध्या भरपावसात उन्हाचा चटका बसतोय. तापमान सतत वाढत असल्यामुळे उकाडाही वाढला आहे. यामुळे जळगावकर चांगलाच हैराण झाला आहे. दोन दिवसापूर्वी जळगावचे तापमान ३६ अंशावर गेले होते. मात्र त्यामध्ये सोमवारी दोन अंशाने घसरण झाली. दरम्यान, पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी पावसासंदर्भात दिलासा देणारी बातमी दिली आहे. येत्या दोन, तीन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यात पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दरम्यान, देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभावामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. केवळ जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यात खरीप हंगाम घेतला गेला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पडलेल्या खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात आला. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. आता पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी पावसासंदर्भात दिलासा देणारी बातमी दिली आहे. येत्या दोन, तीन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हवामान विभागाच्या मॉडेलच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रात येत्या दोन, तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात सहा आणि सात सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस होईल. विदर्भातील काही भाग, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात चांगला पाऊस होणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मान्सून वारे सक्रीय होणार आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात यामुळे आता चांगला पाऊस होणार आहे.
Discussion about this post