भुसावळ । यावल तालुक्यातील बामणोद येथील देवेंद्र पंकज पाटील (वय १९) या तरुणाने तापी नदीच्या पुलावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु नदीत उडी मारल्यानंतर तो जखमी झाला. यानंतर त्याला दवाखान्यात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
इंदिरानगर बामणोद (ता. यावल) येथील देवेंद्र पंकज पाटील (वय १९) असे तरुणाचे नाव आहे. देवेंद्र याने ३ सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तापी नदीच्या पुलावरून उडी घेतल्यानंतर तो गंभीर जखमी झाला. देवेंद्रला उडी मारतांना काहींनी पहिले होते. यामुळे त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घेवुन जात असतांना उपचारापुर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
या संदर्भात भाऊ भूषण पाटील यांनी फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली. देवेंद्रच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अजून समोर आलेले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोकुळ तायडे करत आहे.
Discussion about this post