जळगाव । गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असून, ग्राहकांचे लक्ष सराफ बाजाराकडे लागले आहे. दरम्यान, आज शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत, तर चांदीच्या दरात पुन्हा एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जळगाव सराफ बाजारात बुधवारी (ता. ११) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४१ हजार ५०० रुपये (विनाजीएसटी) होता. त्यानंतर गुरुवारी (ता. १२) बाजार उघडताच सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची मोठी घसरण झाली आणि भाव १ लाख ३९ हजार रुपयांवर आला. शुक्रवारी (ता. १३) पुन्हा अडीच हजार रुपयांची घट होऊन सोने १ लाख ३६ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. आज शनिवारी सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नसून भाव स्थिर आहेत.
दुसरीकडे, चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र कायम आहे. बुधवारी प्रतिकिलो १ लाख ९० हजार रुपये असलेल्या चांदीच्या दरात गुरुवारी पाच हजार रुपयांची मोठी घट झाली होती. त्यामुळे भाव १ लाख ८५ हजार रुपयांवर आले. शुक्रवारी आणखी चार हजारांची घसरण होऊन चांदी १ लाख ८१ हजारांवर आली. आज पुन्हा एक हजार रुपयांची घट झाल्याने चांदीचा भाव प्रतिकिलो १ लाख ८० हजार रुपयांवर पोहोचला आहे.
आजचे जळगाव सराफ बाजारातील दर
(विनाजीएसटी)
२४ कॅरेट सोने : १ लाख ३६ हजार ५०० रुपये (प्रति १० ग्रॅम)
२२ कॅरेट सोने : १ लाख २५ हजार ०३५ रुपये (प्रति १० ग्रॅम)
चांदी : १ लाख ८० हजार रुपये (प्रति किलो)
आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण
गेल्या काही दिवसांतील सोन्याच्या दरांवर नजर टाकल्यास बाजारातील चढ-उतार स्पष्टपणे दिसून येतात.
८ नोव्हेंबर – १ लाख ४२ हजार रुपये
९ नोव्हेंबर – १ लाख ४३ हजार ५०० रुपये
१० नोव्हेंबर – १ लाख ४२ हजार ८०० रुपये
११ नोव्हेंबर – १ लाख ४१ हजार ५०० रुपये
१२ नोव्हेंबर – १ लाख ३९ हजार रुपये
१३ नोव्हेंबर – १ लाख ३६ हजार ५०० रुपये
१४ नोव्हेंबर – १ लाख ३६ हजार ५०० रुपये
एकंदरीत, गेल्या तीन दिवसांत सोन्याचा भाव पाच हजार रुपयांनी घसरला आहे. तर चांदीच्या दरातही सलग घसरण सुरू आहे. त्यामुळे लग्नसराई आणि आगामी खरेदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.















Discussion about this post