जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच स्वाभिमानी सभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज जळगावात येत असून त्यांचे जळगावात आगमन झाले आहे. जळगावातील अजिंठा चौफुलीवर शरद पवार यांचे भव्य स्वागतची तयारी करण्यात आली आहे.
त्यांचे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पवार यांचे स्वागत केले. यावेळी शरद पवार यांचे भव्य श्री पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने जळगाव शहरात शरद पवार यांच्या आगमन होताच तब्बल पाच जेसीबीच्या साह्याने भव्य अशी पुष्पृष्टी तसेच तब्बल सहा क्विंटलचा भला मोठा हार घालून शरद पवार यांचा जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.
Discussion about this post