रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. उत्तर रेल्वे विभागात अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या तब्बल ४,६५१ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना ११ डिसेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी उमेदवाराने किमान ५० टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा आणि सवलत
१ डिसेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क किती?
सर्वसाधारण आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.














Discussion about this post