Friday, November 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नेत्रोपचारापासून बाल अतिदक्षतेपर्यंत; जळगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये अत्याधुनिक सुविधांची भर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
नेत्रोपचारापासून बाल अतिदक्षतेपर्यंत; जळगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये अत्याधुनिक सुविधांची भर
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रसेवेच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून उत्कृष्ट, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवरच झाल्या पाहिजेत. हे रुग्णालय नेत्रोपचार व नवदृष्टीचे आदर्श केंद्र म्हणून नावारूपाला यावे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर, प्रत्येक गरजू रुग्णाला दर्जेदार उपचारांसोबत माणुसकीची वागणूक मिळाली पाहिजे. शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे आणि आधाराचे केंद्र बनले पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नेत्र विभागातील अत्याधुनिक युनिट्ससह मॉड्युलर बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन व वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार नंदकिशोर महाजन, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आधुनिक नेत्रतपासणी व शस्त्रक्रियांच्या सुविधा जळगावातच उपलब्ध झाल्यास विशेषतः वृद्ध आणि गरजू रुग्णांना उपचारांसाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. नेत्र विभाग अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजन करून प्रस्ताव सादर करावेत. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तर ना. गिरीश महाजन यांनी सांगितले की, नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात याकरिता महायुतीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले आहे. भविष्यात प्रस्तावित मेडिकल हब देखील तयार होते आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावांच्या माध्यमातून आपण या हबला पाणीपुरवठा देखील करून घेतला आहे. तसेच मेडिकल कॉलेजला इतर सुविधा मिळण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात असून भविष्यात देशातील टॉप मधील महाविद्यालय व रुग्णालय नागरिकांना उपलब्ध असेल असेही गिरीश महाजन म्हणाले.

वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जळगावचे नाव उंचावले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

अत्याधुनिक सुविधांमुळे रुग्णसेवेला नवे बळ
मॉड्युलर बाल अतिदक्षता विभाग (PICU) : एक महिना ते १२ वर्षे वयोगटातील गंभीर आजारी बालकांसाठी श्वसनविकार, न्यूमोनिया, सेप्सिस, विषबाधा आदींवर अत्याधुनिक अतिदक्षता व आपत्कालीन उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे.
अत्याधुनिक नेत्र विभाग : नेत्रतपासणी, निदान व शस्त्रक्रिया एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यासाठी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ऑपरेटिंग मायक्रोस्कोप, अल्ट्रा-वाईड फील्ड फंडस कॅमेरा, एनडी याग लेसर, व्हिज्युअल फील्ड ॲनालायझर आणि फेको इमल्सिफिकेशन प्रणालीसारखी आधुनिक उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत.
नेत्रदानासाठी विशेष रुग्णवाहिका : नेत्रदान, नेत्रपटल संकलन आणि जनजागृतीला गती देण्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध झाली आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचा विकास व प्रस्तावित मेडिकल हबची सद्यस्थिती विशद केली. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांनी मानले.
यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. उमेश लाड, अधिसेविका अरुणा बोराडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. डॅनियल साजी, संजय चौधरी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्हा बँकेसाठी महायुती एकत्र येणार? मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले..आधी ‘आय लव यू’ म्हणू द्या!

Next Post

तटकरे यांच्या विधानानंतर शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत नवा दावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेर येथे येणार ; हे आहे त्यामागील कारण

तटकरे यांच्या विधानानंतर शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत नवा दावा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
दुष्काळात पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवून शेतकऱ्यांच्या सिंचनालाही आधार देऊ — पालकमंत्री गुलाबराव पाटील

दुष्काळात पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवून शेतकऱ्यांच्या सिंचनालाही आधार देऊ — पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 6, 2026
शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेर येथे येणार ; हे आहे त्यामागील कारण

तटकरे यांच्या विधानानंतर शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत नवा दावा

November 6, 2026
नेत्रोपचारापासून बाल अतिदक्षतेपर्यंत; जळगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये अत्याधुनिक सुविधांची भर

नेत्रोपचारापासून बाल अतिदक्षतेपर्यंत; जळगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये अत्याधुनिक सुविधांची भर

November 6, 2026
मी पण गुलाब गुरुजी झालो असतो… पण ; मंत्री गुलाबराव पाटीलांनी सांगितलं भन्नाट किस्सा

जिल्हा बँकेसाठी महायुती एकत्र येणार? मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले..आधी ‘आय लव यू’ म्हणू द्या!

November 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page