जळगाव । केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी रामू कालोसे हे ५ व ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी आणि सफाई कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व प्रलंबित विषयांबाबत आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी आदिंसह जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत. बैठकीनंतर सायंकाळी ५ वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता ते जामनेर येथील वाल्मीकी नगर वस्तीला भेट देणार असून, तेथील सफाई कर्मचाऱ्यांच्या संघटनेसोबत सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत समस्यांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.















Discussion about this post