यावल : यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उमेश प्रभाकर पाटील, तर उपसभापतीपदी पंकज दिनकर चौधरी यांची ४ नोव्हेंबर रोजी सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत अत्यंत उत्साही वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली असून, महायुतीच्या अंतर्गत ठरलेल्या सूत्रानुसार नव्या पदाधिकाऱ्यांना ही संधी देण्यात आली आहे.
राजीनाम्यामुळे मोकळा झाला होता मार्ग
यावल बाजार समितीचे तत्कालीन सभापती उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत आणि उपसभापती दीपक नरोत्तम चौधरी यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. महायुतीच्या निर्णयानुसार सर्व घटकांना सभापतीपदाचा मान व समान संधी मिळावी, या उदात्त उद्देशाने त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता.
४ नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक एक वाजता बाजार समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी कुणाल सोनार होते, तर बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत उमेश प्रभाकर पाटील आणि पंकज दिनकर चौधरी यांच्या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.
आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत ठरले नाव
यावल बाजार समितीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीचे १९ संचालकांचे भक्कम बहुमत आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी ४ नोव्हेंबर रोजीच भालोद येथे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीतच उमेश पाटील आणि पंकज चौधरी यांच्या नावांवर एकमुखी सहमती निश्चित करण्यात आली होती.















Discussion about this post