सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत सुपरिंटेंडिंग रिसर्च सायंटिस्ट, सिनियर ऑफिसर, सिनियर अकाउंट्स ऑफिसर, हिंदी ऑफिसर आणि कॉन्फिडेन्शियल सेक्रेटरी अशा पदांच्या एकूण ३२ जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत आहे.
रिक्त पदाचा तपशील :
1) सुपरिंटेंडिंग रिसर्च सायंटिस्ट 05
2) सिनियर ऑफिसर (मेकॅनिकल) 14
3) सिनियर ऑफिसर (पेट्रोलियम) 04
4) सिनियर अकाउंट्स ऑफिसर / सिनियर इंटरनल ऑडिटर 06
5) हिंदी ऑफिसर (ऑफिशियल लँग्वेज) 02
6) कॉन्फिडेन्शियल सेक्रेटरी 01
शैक्षणिक पात्रता काय?
पद क्र. १ – सुपरिंटेंडिंग रिसर्च सायंटिस्ट : किमान ६० टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, केमिस्ट्री, जिओलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग किंवा पेट्रोलियम इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. आणि चार वर्षांचा अनुभव.
पद क्र. २ – सिनियर ऑफिसर (मेकॅनिकल) : किमान ६५ टक्के गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदवी.
पद क्र. ३ – सिनियर ऑफिसर (पेट्रोलियम) : किमान ६० टक्के गुणांसह पेट्रोलियम इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधील पदव्युत्तर पदवी.
पद क्र. ४ – सिनियर अकाउंट्स ऑफिसर / सिनियर इंटरनल ऑडिटर : ICAI किंवा ICMAI चे असोसिएट सदस्यत्व.
पद क्र. ५ – हिंदी ऑफिसर : हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी आणि तीन वर्षांचा अनुभव.
पद क्र. ६ – कॉन्फिडेन्शियल सेक्रेटरी : पदवीसह संबंधित सचिवीय किंवा कार्यालय व्यवस्थापनातील डिप्लोमा अथवा समकक्ष पात्रता, संगणकाचे ज्ञान आणि दोन वर्षांचा अनुभव.
अर्ज शुल्क किती?
सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. अनुसूचित जाती-जमाती, ईडब्ल्यूएस, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
वयाची अट: 14 नोव्हेंबर 2026 रोजी, 18 ते 37 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांनी ऑइल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत भरती अधिसूचनेत पदनिहाय पात्रता, आवश्यक अनुभव, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रियेची माहिती तपासावी. त्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे आणि शुल्कासंबंधीच्या सूचना काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.














Discussion about this post