जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी पात्र खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांत सहभागी झालेल्या व्यक्तींकडून १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पुरस्कारांमध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडामहर्षीकरीता जीवनगौरव पुरस्कार व क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यासाठी शासनाने २९ डिसेंबर २०२३ आणि २५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची सुधारित नियमावली २०२३ निश्चित केली आहे.
इच्छुक व पात्र अर्जदारांनी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.















Discussion about this post