बंगळुरु : चांद्रयान-3 च्या मोहीमेनंतर आता इस्रोने सूर्यावर स्वारी मिशनची तयारी सुरु केली आहे. 2 सप्टेंबरला सूर्याभोवती भ्रमंती करणारं आदित्य-एल1 मिशन लॉन्च होणार आहे. हे मिशन खास आहे. कारण भारताच हे पहिलं सौर मिशन आहे. हे मिशन काय आहे? याचं बजेट किती? त्याचा उद्देश काय? समजून घेऊया.
भारताच आदित्य एल-1 उपग्रह याच एका पॉइंटवर जाणार आहे. त्यामुळे या यानाच नाव आदित्य लांग्रेज-1 ठेवण्यात आलं आहे. श्रीहरिकोटा येथील स्पेस सेंटरवरुन हे मिशन लॉन्च करण्यात आलं. पृथ्वीपासून सूर्यापर्यंतच अंतर खूप जास्त आहे. आता जसा चंद्राचा अभ्यास सुरु आहे, तसाच सूर्याचा अभ्यास करण्याचीही तयारी आहे. सूर्याच्या आसपास लांग्रेज पॉइंट आहे.
पृथ्वीपासून 1.5 मिलियन किमी अंतरावर आदित्य एल-1 स्थापित करण्याची योजना आहे. या पॉइंटवरुन सूर्यावर 7 दिवस आणि 24 तास नजर ठेवणं शक्य आहे. त्यामुळे इथून अभ्यास करण सोपं होईल. आदित्य L-1 फोटोस्फीयर, क्रोमोस्फीयर या सूर्याच्या बाहेरच्या थरांचा अभ्यास करण्यासाठी सात पेलोड नेण्यात येतील. चार पेलोड सूर्यावर नजर ठेवतील. 3 पेलोड एल-1 पॉइंटच्या आसापासच्या भागाचा अभ्यास करतील.
कोणी मिशनची आखणी केलीय?
बंगळुरुच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्सने (IIA) आदित्य एल-1 मिशनची आखणी केली आहे. इंटर-यूनिवर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी एंड एस्ट्रोफिजिक्स, पुण्याने सोलर अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलीस्कोप (SUIT) पेलोड या मिशनसाठी विकसित केला आहे.
Discussion about this post