भुसावळ । जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वारंवार घडत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला भुसावळ शहरातून अटक केली आहे. शेख शाकिब शेख दाऊद (वय-२१, रा. जाम महोल्ला, भुसावळ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित शेख शाखेत हा भुसावळ शहरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पोलीस हवालदार लक्ष्मण पाटील, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, महेश सोमवंशी यांच्या पथकाने सोमवारी संशयित शेख शाकीब याला भुसावळ शहरातून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
Discussion about this post