बेंगळुरू । ग्रीस दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट बेंगळुरूमध्ये दाखल झाले. चांद्रयान ३ च्या यशानंतर त्यांनी इस्रोच्या मुख्यालयात पोहोचून मोहिमेतील शास्त्रज्ञांचे कौतुक केले. यावेळी शास्त्रज्ञांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून ३ मोठ्या घोषणाही केल्या.
ज्या स्थानावर चांद्रयान -3 चे विक्रम लँडर उतरले आहे. त्या पॉईंटला शिवशक्ती (Shivshakti Point) या नावाने ओळखलं जाणार आहे.. अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच चांद्रयान-2 चंद्रावर ज्या ठिकाणी पोहोचले होते. ती जागा यापुढे तिरंगा पॉइंट म्हणून ओखळली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तिसरी आणि महत्वाची घोषणा म्हणजे 23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला. त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून जाहीर केला जाईल, असे मोदी म्हणाले.