जळगाव । कंचनगाव, ता. मुक्ताईनगर येथील मूळ रहिवासी तथा निवृत्त कृषी अधिकारी पी. आर. पाटील यांच्या पत्नी भागरथीबाई प्रभाकर पाटील (वय ८२) यांचे गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी जळगाव येथे निधन झाले.
सौ. भागरथीबाई पाटील या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलसचिव डॉ. विनोद प्रभाकर पाटील यांच्या मातोश्री होत.
त्यांची अंत्ययात्रा उद्या शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता व्यंकटेश कॉलनी, साने गुरुजी कॉलनीजवळ, जळगाव येथील निवासस्थानाहून निघणार आहे. त्यांच्यावर नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.















Discussion about this post