Tuesday, August 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

वैद्यकीय पदवी नाही, तरीही रुग्णांवर उपचार; दोन बोगस डॉक्टर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 11, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
वैद्यकीय पदवी नाही, तरीही रुग्णांवर उपचार; दोन बोगस डॉक्टर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात
बातमी शेअर करा..!

जळगाव । कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत नोंदणी नसताना डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करणाऱ्यांविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. चोपडा तालुक्यातील वटार येथे अ‍ॅलोपॅथिक औषधे व इंजेक्शनद्वारे रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले. तर भुसावळातील जामनेर रोडवरील जनसेवा क्लिनिकमध्ये डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.

अडावद पोलिसांना वटार येथे बोगस वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (१० ऑगस्ट) दुपारी पोलिस पथकाने पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी अरुपकुमार अजयकुमार आढळ (४१) हा कोणतीही वैध वैद्यकीय पदवी किंवा वैद्यकीय नोंदणी नसतानाही रुग्णांवर अ‍ॅलोपॅथिक औषधे आणि इंजेक्शनद्वारे उपचार करताना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडील प्रमाणपत्रांची तपासणी केली असता ती वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी वैध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून स्टेथॉस्कोप, विविध प्रकारची औषधे, इंजेक्शन्स आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले. याप्रकरणी पंचनामा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भुसावळातील जनसेवा क्लिनिकवरही कारवाई

दरम्यान, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनीही बोगस डॉक्टरविरोधात कारवाई केली. जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान उमेश मधुकर सपकाळे हे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी पोलिस ठाण्यात आणले.या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले

वैद्यकीय शिक्षण आणि अधिकृत नोंदणी नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या व्यक्तींमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. वटार आणि भुसावळातील कारवाईनंतर बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रामदास पावरा यांची आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेश युवा उपाध्यक्षपदी निवड

Next Post

आदिवासी विकास विभागात शिक्षक पदांच्या 2421 जागांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्याच्या आदिवासी विकास महामंडळात बंपर जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी

आदिवासी विकास विभागात शिक्षक पदांच्या 2421 जागांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपासून मिळणार PF काढण्यासाठी ATM कार्ड

EPFO खातेदारांसाठी मोठी अपडेट; आता घरबसल्या करता येणार अनेक कामे, जाणून घ्या नवे नियम

August 11, 2026
राज्याच्या आदिवासी विकास महामंडळात बंपर जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी

आदिवासी विकास विभागात शिक्षक पदांच्या 2421 जागांसाठी भरती

August 11, 2026
वैद्यकीय पदवी नाही, तरीही रुग्णांवर उपचार; दोन बोगस डॉक्टर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

वैद्यकीय पदवी नाही, तरीही रुग्णांवर उपचार; दोन बोगस डॉक्टर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

August 11, 2026
रामदास पावरा यांची आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेश युवा उपाध्यक्षपदी निवड

रामदास पावरा यांची आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेश युवा उपाध्यक्षपदी निवड

August 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page