धुळे । शहापुर तालुक्यातील वासिंद पोलिसस्टेशनच्या हद्दीतील पिवळी जवळील खोर गावातील सागदरा कुंडामध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. धनंजय दत्तात्रय गायकवाड (वय – २२ रा. मुरबाड) व कार्तिक नागभुषण रेड्डीपाटील (वय – २३ रा. हैदराबाद) असे मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत.
शहापुर तालुक्यातील वासिंद पोलिसस्टेशनच्या हद्दीतील पिवळी जवळील खोर गावातील सागदरा कुंडामध्ये दोन तरुण व एक तरुणी फिरायला आले होते. मात्र प्रत्येक्ष कुंडातील पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने दुदैवाने घटना घडली आहे. सदर दुदैवी घटनेची माहिती वासिंद पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पिवळी- खोर गावातील सारदरा कुँडाजवळ धाव घेत, वासिँद जीव रक्षक टिम सदस्य प्रदीप गायकर,अमित तावडे, गजानन शिंगोळे,ज्ञानेश्वर काठोळे यांच्या विशेष सहकार्यने व मदतीने मृत पावलेल्या तरुणांचा शव कुँडाच्या पाण्यातुन बाहेर काढून शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
तर वासिंद पोलिसांनी सदर घटनेचा संपूर्ण पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील आधिक तपास वासिंद पोलिस ठाण्यात व.पो.नि. समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो.नि. महेश बोलके करत आहेत.















Discussion about this post