सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अभियंता पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने डिझाईन ट्रेनी आणि मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी एकूण 120 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2026 दुपारी 2 वाजेपर्यंत आहे.
रिक्त पदांचा तपशील
डिझाईन ट्रेनी – 60 पदे
मॅनेजमेंट ट्रेनी – 60 पदे
शैक्षणिक पात्रता
डिझाईन ट्रेनी:
B.E./B.Tech (एरोनॉटिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स किंवा मेटलर्जी)
मॅनेजमेंट ट्रेनी:
B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, मेटलर्जी, प्रॉडक्शन किंवा सिव्हिल)
गुणांची अट:
UR/OBC-NCL/EWS – किमान 70% गुण
SC/ST/PWD – किमान 60% गुण
वयोमर्यादा
14 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे असावे.
SC/ST – 5 वर्षे सूट
OBC – 3 वर्षे सूट
इतर माहिती
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क: General/OBC/EWS – ₹500
SC/ST/PWD – शुल्क नाही
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 ऑगस्ट 2026 (दुपारी 2:00 वाजेपर्यंत)
लेखी परीक्षा: 5 आणि 6 सप्टेंबर 2026
सरकारी क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या अभियंता पदवीधरांसाठी ही भरती सुवर्णसंधी मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज पूर्ण करावा.















Discussion about this post