जळगाव : स्वरसम्राट मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगावात “एक शाम रफी के नाम” या भावपूर्ण संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. गोहिल्स जे. के. कराओके, जळगाव आणि ऑर्केस्ट्रा सुरसंगम, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रफी यांच्या अजरामर गीतांना संगीतबद्ध आदरांजली वाहण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम आज शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता रोटरी भवन, मायादेवी नगर, महाबळ रोड, जळगाव येथे होणार आहे. कार्यक्रम वेळेवर म्हणजेच सायंकाळी ६.१५ वाजता सुरू होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
या संगीत मैफिलीत रशीद सालार, जितेंद्र गोहिल आणि अय्युब खान हे प्रमुख गायक रफी यांच्या गाजलेल्या गीतांचा सुरेल आविष्कार सादर करणार आहेत. तसेच शेखर चोपडेकर, कैलास खेन्नार, सरदार तडवी, वसीम शेख, अलबक्ष खान, निकिता बोराडे, शिवानी बोराडे आणि नंदिनी बोराडे हे कलाकारही आपल्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत.
रफी यांच्या सदाबहार गीतांचा आस्वाद घेण्यासाठी जळगावकर संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे नि:शुल्क ठेवण्यात आला आहे.















Discussion about this post