जळगाव । जळगाव पोलीस दलात बदलीचे सत्र सुरूच असून अशातच आता जळगाव जिल्ह्यातील ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा काढले. त्यांना नवीन पदाचा पदभार तात्काळ घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक असे एकुण ३० पोलीस अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहे. गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्रलंबित होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार सक्षम प्रधिकारी म्हणून जिल्हास्तरावरील पोलीस अस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढले आहे.
यात विनंती बदली, नव्याने हजर झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या नवीन नेमणूका, प्रशासकीय बदली बाबत सर्व बाबींचा विचार करून बदल्या करण्यात आल्या. दरम्यान, बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी तातडीने आपल्या बदलीच्या ठिकाणी तात्काळ पदभार स्विकारावा तसा अहवाला जिल्हा पोलीस मुख्यालयात पाठविण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दिले आहे.
Discussion about this post