Saturday, August 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अजित पवारांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 15, 2026
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्य सरकारने माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २२ जुलै रोजी साजरी होणारी त्यांची जयंती यापुढे राज्यभर शासकीय स्तरावर साजरी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

परिपत्रकानुसार, २२ जुलै रोजी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालये आणि विविध शासकीय संस्थांमध्येही त्यांच्या कार्याचा गौरव करणारे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी मागणी केली होती. त्यानंतर शासनाने तातडीने याबाबतचा निर्णय घेत परिपत्रक जारी केले.

राज्य शासनाने सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांच्या यादीत अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश केला आहे. त्यामुळे दरवर्षी २२ जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे.

परिपत्रकानुसार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना कार्यक्रमाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि विविध विभागांमध्ये एकाच दिवशी जयंती कार्यक्रम पार पडणार आहेत.

राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनावरील पकड, विकासकामांवरील भर आणि लोकाभिमुख निर्णयांमुळे अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती. शासनाचा हा निर्णय त्यांच्या कार्याला वाहिलेली अधिकृत आदरांजली मानला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Next Post

राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल; धो-धो पाऊस कोसळणार, वाचा हवामान अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल; धो-धो पाऊस कोसळणार, वाचा हवामान अंदाज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

जळगावात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

August 29, 2026
.. अन्यथा आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार; शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला पत्र, काय आहे मागणी?

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून १० प्रवक्त्यांची घोषणा; नव्या चेहऱ्यांवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी

August 29, 2026
LPG ते कारपर्यंत….१ सप्टेंबरपासून हे ५ मोठे नियम बदलणार

LPG ते कारपर्यंत….१ सप्टेंबरपासून हे ५ मोठे नियम बदलणार

August 29, 2026
खारघरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ३४०० SIR फॉर्म! ५ BLO निलंबित

खारघरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ३४०० SIR फॉर्म! ५ BLO निलंबित

August 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page