Thursday, July 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट; बोदवडच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 2, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट; बोदवडच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
बातमी शेअर करा..!

बोदवड | बोदवड शहरातील प्रभाग क्रमांक १४, मोठा मारोती मंदिर परिसरातील ४१ वर्षीय शेतकरी गणेश एकनाथ राऊत यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि यंदाच्या खरीप हंगामात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुबार पेरणीच्या संकटामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गणेश राऊत यांच्याकडे साळशिंगी शिवारात सुमारे चार एकर शेती होती. मागील वर्षी झालेल्या नापिकीमुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणी करण्यासाठी त्यांनी विकासो संस्थेकडून सुमारे ४२ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. त्याचबरोबर खासगी कर्जाचाही त्यांच्यावर मोठा भार होता.

यंदा मृग नक्षत्रात त्यांनी चार एकर क्षेत्रात मका आणि तुरीची पेरणी केली होती. मात्र, पेरणीनंतर १५ ते २० दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या गणेश राऊत यांनी ३० जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिरा सोड्याच्या बाटलीत विषारी द्रव्य मिसळून त्याचे प्राशन केले.

विष प्राशनानंतर घराजवळ त्यांना उलट्या होत असल्याचे वडील एकनाथ राऊत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने मुलगा विलास राऊत याला बोलावले. त्यानंतर गणेश राऊत यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, जळगावकडे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेची नोंद बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर बोदवड ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत गणेश राऊत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे बोदवड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी आणि पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नवजात बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश; भाजपच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

Next Post

पेपर फुटीनंतर TET ची परीक्षा कधी होणार? तारीख आली समोर; ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘नीट’च्या गोंधळानंतर राज्य परीक्षा परिषद अलर्ट! ‘टीईटी’साठी कडक नियमावली जाहीर; वाचा काय आहे?

पेपर फुटीनंतर TET ची परीक्षा कधी होणार? तारीख आली समोर; 'या' महिन्यात होण्याची शक्यता

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! तत्कालीन पीआयसह ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

July 2, 2026
‘नीट’च्या गोंधळानंतर राज्य परीक्षा परिषद अलर्ट! ‘टीईटी’साठी कडक नियमावली जाहीर; वाचा काय आहे?

पेपर फुटीनंतर TET ची परीक्षा कधी होणार? तारीख आली समोर; ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 2, 2026
पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट; बोदवडच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट; बोदवडच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 2, 2026
नवजात बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश; भाजपच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

नवजात बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश; भाजपच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page