जळगाव । जळगाव जिल्ह्यात गावठी हातभट्टीच्या दारूमुळे तरुण पिढीतील तरूण मुले व्यसनाधीन होत असल्यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमावला आहे. अशातच आता गावठी हातभट्टी वाले जिल्हा पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आहे. जिल्ह्यातील ८५ ठिकाणी कारवाई करून ५ लाख ३२ हजार ८८५ रुपये किमतीचा दारू बनवण्याचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील ठिकठिकाणी एकूण ८५ ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही.टी. बुकन यांच्या पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने कारवाई केली. यात एकूण ५ लाख ३२ हजार ८८५ रुपयांचे कच्चे रसायन आणि हातभट्टीची तयार केलेली दारू पोलिसांनी नष्ट केली आहे.
या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईसाठी पोलीस दलाचे ४६ पोलीस अधिकारी, २२२ पोलीस कर्मचारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ६ अधिकारी आणि २४ कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान गावठी हातभट्टीवाल्यांवर गुन्ह्यांचे रेकॉर्डवरून आतापर्यंत पोलीस दलातर्फे २ तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ अशा तीन जणांवर एमपीडीए च्या कारवाई अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. दरम्यान आता यापुढे देखील गावठी हातभट्टी दारू तयार करणे व विक्री करणाऱ्यांवर एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी हातभट्टी वाले रडारवर आहे.
Discussion about this post