नाशिक । राज्यात लाचखोरीचे प्रमाणत वाढतच असल्याचे दिसत असून कालच जळगाव जिल्ह्यातील विशेष लेखापरीक्षकाला ५ लाखांची लाच घेताना अटक केली असताना नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील लेखा अधिकाऱ्यास 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
प्रकरण काय?
तक्रारदार यांच्या वडिलांच्या मालकीच्या इमारती आंबोली येथील दोन वसतिगृहांसाठी 2021 ते 2024 या भाडे कराराने दिलेल्या आहेत. इमारत क्रमांक 422/1 चे एप्रिल ते जून 2023 पर्यंतचे घरभाडे दोन लाख 93 हजार 994 रुपये तसेच इमारत क्रमांक 422/2 चे एप्रिल ते जून 2023 पर्यंतचे घरभाडे 1 लाख 656 हजार 264 रुपये असे एकूण चार लाख 59 हजार 258 रुपये थकीत घरभाड्याची बिले प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवण्यापूर्वी लेखा अधिकारी, भास्कर रानोजी जेजुरकर यांच्याकडे प्रलंबित होते. बिलांची पडताळणी करुन मंजुरीकरता सादर करण्यासाठी भास्कर जेजुरकर यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
ही रक्कम स्वीकारताना भास्कर जेजूरकर यांना शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीकडून संबंधित लेखा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post