Monday, June 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाऊस लांबल्याने सरकारचा शेतकऱ्यांच्या वर्मावर घाव घालणारा निर्णय!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 15, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावांवर कठोर निकष ; ४० पैकी फक्त ३ प्रस्ताव मंजूर
बातमी शेअर करा..!

मुंबई । प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडला असून राज्यात अद्याप तो पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. यामुळे अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, शेतीची कामे रखडली आहेत आणि पेरण्याही प्रलंबित आहेत. अशा बिकट परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. कृष्णा आणि गोदावरी नदी खोऱ्यांतर्गत येणाऱ्या सर्व धरणांमधील सिंचनाचा (शेतीचा) पाणीपुरवठा पुढील ३ महिने पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आहे.

जलसंपदा मंत्र्यांनी विभागाला स्पष्ट आणि कडक निर्देश दिले आहेत की, धरणांमध्ये शिल्लक असलेले पाणी केवळ आणि केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जावे. शेती किंवा सिंचनासाठी धरणांतून पाणी सोडणे तात्काळ बंद करावे. पुढील ३ महिने सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये, यालाच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील धरणांमधील सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. सध्या राज्यातील जलाशयांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यातील पाणीसाठ्याशी तुलना केल्यास यंदा हा साठा खूपच कमी आहे. मान्सूनला झालेल्या विलंबामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक झालेली नाही, परिणामी जलसंपदा विभागाने संपूर्ण पाणी व्यवस्थापनाचा नवीन कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक, अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे आणि संपूर्ण मराठवाडा विभागातील जलाशयांमध्ये जोपर्यंत पावसाचे नवीन पाणी येत नाही, तोपर्यंत उपलब्ध पाण्याचा थेंब अन् थेंब जपून वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर होणार थेट जेलवारी!
धरणांमधून आणि नद्यांमधून होणाऱ्या पाणी चोरीला आळा घालण्यासाठी सरकारने आक्रमक पाऊल उचलले आहे. बंदीच्या काळात कोणीही बेकायदेशीरपणे पाणी उपसा करत असल्याचे आढळल्यास, पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त मदतीने संबंधित व्यक्तींवर थेट कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अभिनेत्री संचिता उगलेने संपवले जीवन; मनोरंजन विश्वावर शोककळा

Next Post

ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची शक्यता! ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? हालचाली वाढल्या!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची शक्यता! ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? हालचाली वाढल्या!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगावात निवृत्तीवेतनधारकांसाठी जिल्हा पेन्शन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन

June 15, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

अखेर तारीख ठरली! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची शक्यता! ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? हालचाली वाढल्या!

June 15, 2026
शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावांवर कठोर निकष ; ४० पैकी फक्त ३ प्रस्ताव मंजूर

पाऊस लांबल्याने सरकारचा शेतकऱ्यांच्या वर्मावर घाव घालणारा निर्णय!

June 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page