धुळे : जिल्ह्यातील शिरपूर येथील सावळदे पुलावरील आत्महत्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच उच्चशिक्षित तरुणीने तापी नदीवरील सावळदे पुलावरून उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. नदीत मासेमारी करणाऱ्यांना या तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आल्यानं हि घटना समोर आली आहे.
धुळे येथील २४ वर्षीय तरुणीने सावळदे पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सिव्हिल इंजीनियरिंग पूर्ण केलेल्या या उच्चशिक्षित तरुणीने हे टोकाचे पाऊल का उचललं? याबाबत अद्यापही कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तरी दुपारच्या सुमारास अचानक या तरुणीचा मृतदेह परिसरातील मच्छीमारांना पाण्यावर तरंगताना आढळून आला.
मच्छीमारांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांनी तात्काळ मच्छीमारांच्या मदतीने या तरुणीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला व त्यानंतर हा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी या तरुणीला मृत घोषित केले.
दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महिन्याभरापूर्वी या संदर्भात गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. तरी देखील याकडे अद्याप जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळेच आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे लावण्यात येत आहे. आता तरी जिल्हा प्रशासनाने तात्काळ या घटनेची दखल घेत सावळदे पुलावर संरक्षक जाळी बसवावी व पालकमंत्र्यांच्या आदेशाचे तरी पालन जिल्हा प्रशासनाने करावे अशी मागणी स्थानिकांतर्फे करण्यात येत आहे.
Discussion about this post