जळगाव । तालुक्यातील पाळधी येथे गोमांसची वाहतूक करत असल्याच्या संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना घडली असून यावेळी पोलीस व संतप्त तरुणांत प्रचंड वाद झाला. पोलिस लाठीचार्ज करीत असताना तरुणांनी देखील त्यांच्यावर दगडफेक केली. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे कळते. दरम्यान, या घटनेमुळे पाळधी गावासह परीसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.
बांभोरी एसएसबीटी कॉलेजजवळ पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गुरुवारी रात्री 9 वाजता एक ट्रक थांबला होता. त्यातून दुर्गंधी येत असल्याने काही तरुणांना संशय आला. त्यांनी ट्रकचालकाची विचारपूस सुरू केल्यावर त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे तरुणांसह पेट्रोल पंपावरील कर्मचार्यांनी पाळधी दूरक्षेत्राला फोन करुन माहिती दिली. काही वेळातच एक पोलीस कर्मचारी पंपावर दाखल झाला. त्यानंतर हा ट्रक पाळधी दूरक्षेत्राला जमा न करता बायपासच्या दिशेने पुढे जात असल्याने पोलीस कर्मचाार्याने ट्रक सोडून असल्याचा संशय पाठीमागून येणार्या तरुणांचा झाल्याने यांनी ट्रक अडवला आणि ट्रकचालकास मारहाण करीत ट्रक पेटवून दिला.
या प्रकारामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी तसेच परीसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी तरुणांची गर्दी पांगवण्यासाठी लाठीहल्ला केला. तरीदेखील तरुणांनी घटनास्थळ न सोडता ट्रक पेटवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार घटनास्थळी पोहोचले होते. परीस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या पाळधीत दाखल झाल्या.
Discussion about this post