Sunday, May 31, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 31, 2026
in महाराष्ट्र
0
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा
बातमी शेअर करा..!

मुंबई/छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या तब्बल अडीच तासांच्या चर्चेनंतर सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याचा दावा करण्यात आला. यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगे यांनी उपोषण मागे घेतले.

सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील चर्चेदरम्यान शासनाच्या मसुद्यात (ड्राफ्ट) काही बदल सुचविण्यात आले होते. सरकारने या सूचनांना मान्यता दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील शासन निर्णय काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उपोषण सोडल्यानंतर उपस्थित महिलांनी मनोज जरांगे यांचे औक्षण केले. त्यानंतर प्रकृती तपासणी आणि उपचारांसाठी ते रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी हॉस्पिटलकडे रवाना झाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना शैक्षणिक प्रवेशापूर्वी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी शासनाने स्पष्ट सूचना द्याव्यात किंवा त्यासाठी दोन स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सातारा गॅझेटच्या प्रक्रियेसाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

जरांगे यांच्या मते, शासनाकडे उपलब्ध असलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींची यादी ग्रामपंचायत स्तरावर जाहीर करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी सुमारे ३९ लाख नागरिकांना आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून उर्वरित पात्र व्यक्तींनाही लवकरच प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

या प्रक्रियेचा आढावा महाराष्ट्रातील सर्व विभागीय आयुक्तांमार्फत दर १५ दिवसांनी घेतला जाणार आहे. पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही जरांगे यांनी सांगितले.

याशिवाय स्वतंत्र ‘मराठा-कुणबी मंत्रालय’ स्थापन करण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत देण्यात आली असून तोपर्यंत विशेष कक्ष (सेल) सुरू करण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबांना पुढील १५ दिवसांत आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच मराठा समाजाच्या विविध महामंडळांसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकही जाहीर करण्यात येणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलनातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, सरकारकडून येत्या काही दिवसांत संबंधित निर्णयांची अंमलबजावणी सुरू होणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव विधान परिषदेसाठी मविआकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर; महायुतीमधील संभ्रम संपेना

Next Post

१ जूनपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम; LPG सिलेंडर, विमान प्रवासासह ‘हे’ ६ मोठे बदल लागू!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

१ जूनपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम; LPG सिलेंडर, विमान प्रवासासह 'हे' ६ मोठे बदल लागू!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0

सरकारी नोकरीची मोठी संधी! UPSC कडून विविध मंत्रालयांमध्ये १९४ पदांसाठी भरती जाहीर

May 31, 2026
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

१ जूनपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम; LPG सिलेंडर, विमान प्रवासासह ‘हे’ ६ मोठे बदल लागू!

May 31, 2026
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा

May 31, 2026
जळगाव विधान परिषदेसाठी मविआकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर; महायुतीमधील संभ्रम संपेना

जळगाव विधान परिषदेसाठी मविआकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर; महायुतीमधील संभ्रम संपेना

May 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page