मुक्ताईनगर । मुक्ताईनगर तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. घरात पैसे देणे घेण्याच्या वादातून भावाने भावाचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून मारेकरी भावाला पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत असं कि, मुखा मानकू शिंदे हे आपल्या परिवारासह मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड वस्ती येथे वास्तव्याला होते. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ पंढरी मानकू शिंदे यांच्यात पैशांवरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या रागातून पंढरी याने भाऊ मुखा शिंदे यांच्या डोक्यात दगड टाकला. त्यात ते गंभीर जखमी झाला.
त्यांना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तयत मुखा शिंदे याचा मुलगा दगडू मुखा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरी मानकू शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी पंढरी मानकू शिंदे याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेढे करीत आहे.
Discussion about this post