पदवीधरांना राज्य शासनाच्या सेवेत जाण्याची संधी असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ‘महाराष्ट्र उप-आदेशित सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022’ पदाच्या एकूण 823 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात असून ऑनलाईन अर्ज 18 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2023 आहे.
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022
पदाचा तपशील :
1) दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) 78
2) राज्य कर निरीक्षक (गट-ब) 93
3) सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) 49
4) पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) 603
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाचे पदवीधर, पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षास बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र रमापा उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. तसेच अंतर्वासित (Internship) किया कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
वेतनश्रेणी – एस.14. रुपये 38600 122800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
MPSC ने आयोजित केलेल्या या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज शुल्क अराखीव (खुला) – रु. 719/- तर मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/ दिव्यांग – रु. 449/- आकारण्यात येत आहे.
Discussion about this post