Saturday, May 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चोपड्याचे निवृत्त प्राध्यापक सायबर भामट्यांच्या जाळ्यात; ‘ब्लॉक ट्रेडिंग’च्या नावाखाली तब्बल १५.५० लाख लुटले!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 9, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अरे बापरे: मुख्याध्यापकांच्या बँक खात्यातून लांबविले लाखो रुपये
बातमी शेअर करा..!

जळगाव । ब्लॉक ट्रेडिंगच्या माध्यमातून अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोपडा येथील एका निवृत्त प्राध्यापकाची तब्बल १५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक बन्सीलाल गुजराथी (रा. चोपडा) असे फसवणूक झालेल्या ६० वर्षीय निवृत्त प्राध्यापकाचे नाव आहे. ते अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी प्राध्यापक दीपक गुजराथी यांना फेसबुकवर ‘ब्लॉक ट्रेडिंग’ संदर्भातील एक आकर्षक जाहिरात दिसली. अधिक नफा मिळण्याच्या आशेने त्यांनी जाहिरातीमधील फॉर्मवर आपली सर्व माहिती भरली. त्यानंतर ५ मार्च रोजी त्यांना सविता रमेश नावाच्या महिलेचा व्हिडिओ कॉल आला. तिने आपण नामांकित ‘एसबीआय सेक्युरिटीज बँक अँड ट्रेडिंग सिस्टीम’मधून बोलत असल्याचे सांगून त्यांचे कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन केले आणि गुंतवणुकीसाठी एक लिंक पाठवली.

सुरुवातीला विश्वासासाठी गुजराथी यांनी १० हजार रुपये गुंतवले. त्यावर चांगला नफा दिसत असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी त्यांना मोठी गुंतवणूक करण्यास सांगितले. “ब्लॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना कमीत कमी दोन आयपीओ (IPO) खरेदी करणे अनिवार्य आहे,” असा नियम सांगून भामट्यांनी गुजराथी यांना वारंवार वेगवेगळ्या खात्यांवर १५ लाख ५० हजार रुपये भरायला लावले. खात्यावर मोठा नफा दिसत असतानाही जेव्हा त्यांनी आपले शेअर्स विकून पैसे बँक खात्यात काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पैसे निघत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. वारंवार विचारणा करूनही पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री पटताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याप्रकरणी दीपक गुजराथी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा शपथविधी रद्द ; धक्कादायक कारण आले समोर

Next Post

जळगाव PWD मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; ५ लाखांची लाच घेताना शाखा अभियंता जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगाव PWD मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; ५ लाखांची लाच घेताना शाखा अभियंता जेरबंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव एसपी बंगल्यावरील सुरक्षेत हलगर्जीपणा; दोन अंमलदार निलंबित, पोलीस विभागात खळबळ

May 9, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगाव PWD मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; ५ लाखांची लाच घेताना शाखा अभियंता जेरबंद

May 9, 2026
अरे बापरे: मुख्याध्यापकांच्या बँक खात्यातून लांबविले लाखो रुपये

चोपड्याचे निवृत्त प्राध्यापक सायबर भामट्यांच्या जाळ्यात; ‘ब्लॉक ट्रेडिंग’च्या नावाखाली तब्बल १५.५० लाख लुटले!

May 9, 2026
तामिळनाडूत विजय यांच्या १०७ आमदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा! देशाच्या राजकारणात खळबळ !

तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा शपथविधी रद्द ; धक्कादायक कारण आले समोर

May 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page