भुसावळ । जिल्ह्यात सध्या गुन्हेगाराचे प्रमाण वाढत चालले असून यातच भुसावळ तालुक्यातील कुऱ्हेपानाचे येथील हॉटेल राजवाडा मध्ये रविवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकून केला सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापकाकडून परप्रांतीय 3 युवतींची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे . या प्रकरणी हॉटेल मालक संभाजी एकनाथ पाटील रा. जामनेर आणि व्यवस्थापक पंडित टोंगळे रा. कुऱ्हे पानाचे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कूर्हे पानाचे येथील राजवाडा हॉटेल व लॉजिंग वर पोलिसांनी रविवारी दुपारी अडीच वाजता छापा टाकला. त्यात हॉटेल मॅनेजर पंडित टोंगळे व मालक संभाजी एकनाथ पाटील स्वतःच्या फायद्यासाठी पीडित महिलांना पैशाचे प्रलोभन देऊन देह व्यापारास प्रवृत्त करत होते.
पोलिसांनी तिन्ही महिलांना विचारपूस केल्यावर ही माहिती समोर आली. त्यामुळे स्त्रिया आणि मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधात अधिनियम १९५६ नुसार हॉटेल व्यवस्थापक पंडित वय ५६ रा. कुर्हे पानाचे भुसावळ तसेच मालक संभाजी एकनाथ पाटील वय ४५ रा. जामनेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तर देहविक्री करणाऱ्या तिन्ही परप्रांतीय तरुणींची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात हलवण्यात आले.पुढील तपास पोलीस करत आहेत.
Discussion about this post