मुंबई : मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. अखेर न्यायालयाकडून नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मलिकांच्या जामीनाची प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे. प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मान्य केलीये. या जामिनाची प्रक्रिया आज मुंबई सत्र न्यायालयात पूर्ण केली जाईल. विशेष कोर्टानं रिलीज ऑर्डर दिल्यानंतर मलिकांच्या सुटकेचे आदेश जारी होणर आहेत.
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेले नवाब मलिक हे गेल्या वर्षभरापासून कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार घेत आहेत. नवाब मलिकांना 11 ऑगस्टला जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जाणून घेऊया नवाब मलिकांच्या जामीनाच्या प्रक्रिया कशी असणार आहे.
नवाब मलिक यांची जामीन प्रक्रिया कशी असेल?
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत सत्र न्यायालय, मुंबई येथे दाखल करावी लागेल.
त्या करता Taken on Todays बोर्ड चा अर्ज करावा लागतो, कोर्ट असे अर्ज तात्काळ स्वीकारतात
सत्र न्यायालय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सत्र न्यायालतील रेजिस्ट्री विभागाला कोर्टातील File पाठवणार
त्यानुसार रेजिस्ट्री विभाग जमिनाचे पैसे भरून / जामीनदारच्या कागदोपत्री तपासणी करून सुटकेचा ‘Memo’ मुंबई मध्यवर्ती कारागृहास देणार
हा Memo नवाब मलिकांचे वकील हातोहत घेऊन जेल अधिकारी यांना देणार
कारण डब्यात टाकून उशीर होईल आणि नवाब मलिक सध्या रुग्णालयात आहेत.
Memo मिळाल्यावर जेल अधिकारी आपली कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करणार
रुग्णालयात उपस्थिती असलेल्या जेल पोलीसला फोन किंवा स्वतः जाऊन कळवणार.
त्यानंतर नवाब मलिक रुग्णालयातून थेट घरी जाणार