जळगाव । फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर चौधरी दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा मित्रपरिवार, गौरव ग्रंथ प्रकाशन समिती, मधुस्नेह संस्था परिवार आणि कौटुंबिक सदस्य यांचे तर्फे कमल पॅराडाईजच्या हॉलमध्ये भव्य गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजन गौरव ग्रंथ समिती, मित्रपरिवार आणि कौटुंबिक सदस्य आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांचे हस्ते स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच मधुस्नेह संस्था परिवारातर्फे आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. मधुस्नेह परिवारातर्फे शुभेच्छापत्राचे वाचन प्राध्यापक सागर धनगर यांनी केले. गौरव ग्रंथाचे प्रकाशन उच्च शिक्षण विभाग जळगावचे माजी सहसंचालक डॉक्टर सतीश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
गौरव ग्रंथाची भूमिका प्राध्यापक बी. पी. सावखेडकर यांनी विशद केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी कुलगुरू के. बी. पाटील, डॉ. शिवाजीराव पाटील, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू एस. टी. इंगळे, माजी आमदार सुधीर तांबे, नंदूदादा बेंडाळे उपस्थित होते. गौरवमूर्ती प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन बडगुजर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ अरविंद चौधरी यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, एन मुक्टो संघटनेचे पदाधिकारी, कौटुंबिक सदस्य, मधुस्नेह संस्था परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.