महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जळगाव येथे भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. 18 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या भरती मार्फत एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
आवश्यक पात्रता :
संसाधन व्यक्ती : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय श्रेणी : किमान 18 वर्षे असावे कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क :
तसेच अर्जदाराकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
अर्ज कुठे आणि कसा कराल?
उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना, पदासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे याचा सविस्तर तपशील जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या कार्यालयाच्या वेबसाईवर प्रसिध्द करण्यात आला आहे. यानंतर उमेदवारांनी आपले अर्ज उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव या पत्त्य़ावर पाठवायचे आहेत.
उमेदवारांनी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयात 18 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत. कागदपत्रे सोबत नसलेले आणि अपूर्ण माहितीसह प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.