नवी दिल्ली । रेशन कार्डवर मोफत अन्नधान्य मिळवणाऱ्या देशातील कोट्यवधी लाभार्थ्यांसाठी सरकारने आता कडक पावले उचलली आहेत. रेशन वितरण प्रणालीतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ई-केवायसी’ (e-KYC) अनिवार्य केले आहे. ज्या लाभार्थ्यांनी विहित मुदतीत हे काम पूर्ण केले नाही, त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते.
३० एप्रिल ही ‘डेडलाईन’; मुदतवाढ मिळणार नाही!
शासनाने ई-केवायसी करण्यासाठी आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत संपत आली होती, मात्र तांत्रिक अडचणी आणि लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता ही अंतिम संधी देण्यात आली आहे. ३० एप्रिलनंतर बायोमेट्रिक अपडेट न करणाऱ्या सदस्यांची नावे रेशन कार्डवरून कमी केली जातील किंवा संपूर्ण कार्डच बंद केले जाईल.
जे लोक चुकीच्या मार्गाने रेशन कार्डवरुन धान्य घेतात, त्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हजारो लोक मृत व्यक्तीच्या नावावर रेशन घेतात. एकाच आधार कार्डशी अनेक रेशन कार्ड लिंक आहेत. त्यामुळेत बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
केवायसी कशी करायची?
रेशन कार्ड केवायसी करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. ज्या सदस्यांचे रेशन कार्डवर नाव आहे त्यांना आधार कार्ड घेऊन रेशन दुकानावर जायचे आहे. यानंतर तुम्हाला फिंगरप्रिंट बायोमेट्रिक करायचे आहे. ज्या सदस्यांचे रेशन कार्डवर नाव आहे त्यांना सर्वांना बायोमेट्रिक करायचे आहे. यासाठी ३० एप्रिलपर्यत मुदत आहे.















Discussion about this post