मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उरले-सुरले आमदार आणि खासदार पुढील एका महिन्यात फुटतील,” असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
यामुळे राज्यात ऑपरेशन टायगरची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या काही खासदारांमध्ये एक ‘गुप्त बैठक’ झाल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेला आता संजय शिरसाट यांनी दुजोरा दिला आहे. शिरसाट म्हणाले की, “ठाकरे गटाचे अनेक लोक सध्या एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. पुढच्या एक महिन्यात तुम्हाला ‘ऑपरेशन टायगर’चा प्रत्यय येईल. त्यावेळी नेमके कोण आणि किती जण सोबत येत आहेत, हे सर्वांना स्पष्ट होईल.”
ठाण्यातील त्या कथित गुप्त बैठकीच्या वृत्तानंतर ठाकरे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. शिरसाट यांच्या विधानामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आपली संघटना पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे त्यांच्याच शिलेदारांवर शिंदे गटाने ‘जाळे’ फेकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.















Discussion about this post