जळगाव | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एरंडोल ,म्हसावद रोड येथे १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आली आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये क्युएस कॉर्प लिमिटेड, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल आणि युवाशक्ती फाउंडेशन, जळगाव यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे.
या मेळाव्यास १० वी, १२ वी, बी.कॉम, एम.कॉम तसेच इतर पदवीधर पात्रता असलेले इच्छुक उमेदवार सहभागी होऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी https://roger.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असल्यास आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉग-इन करून उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी देखील सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मेळाव्याच्या दिवशी थेट उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंड जवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५) प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.















Discussion about this post