नाशिक । नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरण अधिक गंभीर होत चालले असून पीडित महिलांच्या तक्रारींची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत आणखी ११ महिलांनी पुढे येत तक्रार दाखल केल्याने एकूण तक्रारींची संख्या १९ वर पोहोचली आहे. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान अशोक खरातने १०० पेक्षा अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केले असून खरातच्या अत्याचारांचे अश्लील व्हिडिओ १५ ते २० रुपयांना विकले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अशोक खरात आणि संबंधित सोशल मीडिया हँडल्सवर गुन्हा दाखल केला आहे.
तीचा मृत्यू अटळ आहे तसंच कुटुंबियांच्या जीवाची भीती दाखवून नराधम खरातने महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देवाची ऊर्जा देण्याच्या नावाखाली भोंदू खरात महिलांचं शोषण करत होता. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.















Discussion about this post