जळगाव । राज्यात सुरू असलेल्या प्रशासकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेत महत्त्वाचा फेरबदल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारने त्यांच्यावर नव्या जबाबदारीची धुरा सोपवत मुंबईतील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA) च्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यात विविध विकासकामांना चालना मिळाली होती.
दरम्यान, करिश्मा नायर या जळगाव जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. त्या यापूर्वी नाशिक महानगरपालिका येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.
नायर यांनी नाशिकमध्ये काम करताना शिस्तबद्ध प्रशासनाची छाप सोडली असून, जळगाव जिल्ह्यात ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अधिक प्रभावी काम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.















Discussion about this post