रायपूर (छत्तीसगड): सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या ओळखीचे रूपांतर गुन्ह्यात होण्याच्या घटना वाढत असतानाच, छत्तीसगडमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका 25 वर्षीय विवाहित महिलेने 16 वर्षीय मुलाला हॉटेलमध्ये बोलावलं आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.याप्रकरणी मुलाने महिलेविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
आरोपी महिलेचे नाव ख्याती विश्वकर्मा असून, काही महिन्यांपूर्वीच तिचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नापूर्वीपासूनच ती या पीडित अल्पवयीन मुलाच्या संपर्कात होती. १ एप्रिल २०२६ रोजी ख्यातीने या मुलाला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. तिथे पोहोचल्यानंतर तिने मुलावर भावनिक दबाव टाकला आणि विविध आमिषे दाखवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
घटनेनंतर महिलेने पीडित मुलाला या प्रकाराबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. या धमकावणीमुळे आणि घडलेल्या प्रकारामुळे मुलगा प्रचंड मानसिक दडपणाखाली आला होता. मात्र, मुलाने ध्येर्याने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.पोलिसांनी देखील महिलेला तात्काळ अटक केली… सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.















Discussion about this post