मुंबई : राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी (eKYC) करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांना आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम संधी उपलब्ध झाली आहे.
यापूर्वी ई-केवायसीची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी संपली होती. मात्र तांत्रिक अडचणी, चुकीची माहिती भरणे आणि काही लाभार्थ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला असून, बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावर दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत जमा केली जाते. मात्र, काही अपात्र किंवा बोगस लाभार्थी योजना घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली. या प्रक्रियेद्वारे पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना आवाहन केले आहे की, ३० एप्रिलपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा योजनेचा लाभ बंद होऊ शकतो.














Discussion about this post