महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली असून लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरमहा १५०० रुपये देणाऱ्या या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
याआधी जानेवारी महिन्याचा हप्ताही उशिरा मिळाला होता. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र मार्च संपत आला तरीही पैसे खात्यात न आल्याने महिलांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात येऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण ३००० रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
तसेच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी (KYC) पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही किंवा त्यात त्रुटी आहेत, त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. अशा लाभार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत दुरुस्ती करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे.















Discussion about this post