जळगाव । पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना भरचौकात बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वीच पाचोरा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. यामध्ये या पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर आता या पत्रकाराला मारहाण करण्यात आलीय.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण झाल्याच्या घटनेवरुन आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. या मारहाणीचा व्हि़डिओ ट्वीट करत त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रोहित पवार म्हणाले की, पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची .का ? तर त्याने विरोधात बातमी छापली. विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल असं त्यांनी म्हटलं.
पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….
विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले… pic.twitter.com/cjMxWbT1y3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2023
त्याचशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे, परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे अशी नाराजीही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, एका लोकप्रतिनिधीने पत्रकाराला शिवीगाळ करणे उचित नाही. परंतु जे काही आज घडले, त्यांना रस्त्यात मारहाण केली हे अशोभनीय आहे. गुंडगिरीचे वातावरण पाचोऱ्यात झाले आहे. याचा निषेध आहे. पाचोरा तालुक्याचा इतिहास राजकीय सुसंस्कृतीचा आहे. मागच्या गोष्टीचे अनुकरण आपण केले पाहिजे. राजकीय वारसा जपला पाहिजे. पाचोऱ्यात याआधीही अनेक नेत्यांवर टीका झालीय, घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. त्यामुळे सर्वांनी सुसंस्कृत वारसा जपणे गरजेचे आहे अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर केली आहे.
Discussion about this post