हिंगोली । अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. यातच हिंगोलीतून आता एका शाळकरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ७ ते ८ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हिंगोलीच्या वसमतमध्ये खाजगी शाळेच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात ते आठ चिमुकले गंभीर जखमी झालेत. अपघात झालेली व्हॅन युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलची असल्याचं समजलं आहे.
सकाळी विद्यार्थ्यांना घरून शाळेत घेऊन येताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेलेल्या या बसचा चालक मध्येच बदलण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही माहिती दिली असून ड्रायव्हर बदलल्यानेच अपघात झाल्याचा आरोप आता पालकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती.
Discussion about this post