रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. मध्य रेल्वे मुंबई येथे विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज https://cr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर या भरती अंतर्गत एकूण १३०३ रिक्त जागा भरण्यात येणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वे भरती मंडळ मुंबई यांनी ऑगस्ट २०२३ च्या जाहिरातीमध्ये दिली आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर या पदांसाठी ही भरती होईल.
भरतीसाठी पात्रता काय?
असिस्टंट लोको पायलट – संबंधित क्षेत्रात १० वी पास/ ITI// SSLC + कोर्स पूर्ण
तंत्रज्ञ – १० वी पास/ संबंधित क्षेत्रात ITI/ SSLC अधिक अभ्यासक्रम पूर्ण
कनिष्ठ अभियंता- संबंधित क्षेत्रात डिप्लोमा
ट्रेन मॅनेजर- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी किंवा त्याच्या समकक्ष
एकूण रिक्त पदे – १३०३
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.rrccr.com/
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – ४२ वर्षे
ओबीसी – ४६
SC/ST – ४७
जाहिरात पहा : PDF
Discussion about this post