नागपूर । भारतीय जनता पक्षाच्या एका महिला नेत्या सना खान अचानक बेपत्ता झाल्यामुळे महाराष्ट्रातील नागपुरात खळबळ उडाली आहे. सना खान १ ऑगस्टपासून रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे व्यावसायिक कामासाठी गेल्या होत्या, त्यानंतर त्या परतल्याच नाही. याप्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सना खान यांची जबलपूरच्या एका व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी होती. १ ऑगस्ट रोजी त्या नागपूर येथून जबरलपूरला गेल्या होत्या. मात्र, सना खान परतल्यातच नाही. त्यांचा फोनही लागत नाही. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांनी नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच नागपूर पोलिसांचे पथक जबलपूर मध्ये दाखल झाले आहे. मात्र, अद्यापही सना खान यांचा शोध लागलेला नाही.
दरम्यान, सना भाजपच्या अल्पसंख्याक सेलशी संबंधित होती. सना बेपत्ता होण्यासाठी जबलपूरचा गुन्हेगार अमित उर्फ पप्पू साहू जबाबदार असल्याचे कुटुंबीय सांगत आहेत. दुसरीकडे पप्पूही बेपत्ता आहे सनाशी कोणताही संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.
Discussion about this post